सातारा जिल्ह्यातील पावसाळ्यात फिरता येतील अशी पर्यटनस्थळे/ Tourist places in Satara that can be visited in the rainy season
पावसाळ्यात वातावरण अतिशय प्रसन्न आणि अल्हाददायक असते.सभोवताली हिरवेगार डोंगर,नदी नाल्यातील खळखळाट, पाण्यामुळे तयार झालेले धबधबे, आपणाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात अशा वातावरणात कुटुंबासोबत किंवा मित्र मैत्रिणी सोबत फिरायला जाणे म्हणजे जणू काही पर्वणीच. सातारा जिल्हा नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. जसे की नवजा हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे तर मान खटाव हे तालुके अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणून परिचित आहेत. सातारा जिल्ह्या तसे पर्यटकांसाठी नंदनवन म्हणून परिचित आहे. पावसाळ्यातील पर्यटकांचे आकर्षण बनण्याचे कारण सातच्या पश्चिमेला असलेली सह्याद्री पर्वतरांग याठिकाणी उंच उंच डोंगर नद्यांची उगमस्थाने कड्यावरून वाहणारे उंचच्या उंच धबधबे पर्यटकांना विशेष आकर्षित करतात तर चला मग या पावसाळ्यात फिरता येतील अशा सातारा जिल्ह्यातील ठिकाणांची सैर करू आणि पाहू तुम्ही कोणत्या ठिकाणाला भेट देतात. १ ठोसेघर धबधबा ठोसेघर धबधबा हा सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे या...