ETF म्हणजे काय
ETF म्हणजे Exchange-Traded Fund (एक्सचेंज ट्रेडेड फंड). हा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे. हा स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड केला जातो, अगदी स्टॉकप्रमाणे शेअर बाजाराच्या कामकाजाच्या वेळेत तुम्ही यांची खरेदी विक्री करु शकता.या साठी तुमच्याकडे डिमॅट अकाउंट व ट्रेडिंग अकाउंट आसने आवश्यक आहे. म्युच्युअल फंडाच्या तुलनेत इटिए्फ मध्ये खर्च अगदी कमी आहे, व यामध्ये एक्झीट लोड भरावा लागत नाही.ETF एक प्रकारचा फंड आहे जो वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतो, जसे की शेअर्स, बाँड्स, वस्तू (जसे सोनं किंवा तेल), किंवा विविध निर्देशांक (index).
ETF ची मुख्य वैशिष्ट्ये:
1. स्टॉकसारखा ट्रेड: ETF चा व्यापार शेअर मार्केटमध्ये दिवसभर होतो, आणि त्याची किंमत सतत बदलत असते. जो तुम्हाला बाजाराच्या चढ उताराचा फायदा मिळवून देऊ शकतो.
2. विविधता (Diversification): एका ETF मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स किंवा मालमत्ता असतात. ETF मधील गुंतवणूक वेगवेगळ्या इंडेक्स मध्ये केली जात असल्याने जोखीम कमी होते.
3. खर्च प्रभावीता: ETF चे व्यवस्थापन शुल्क कमी असते,त्याचा खर्च ०.०४ इतका असतो.त्याच बरोबर यावर एक्झीट लोड नसतो. बहुतेक ETF "पासिव्हली मॅनेज्ड" असतात. म्हणजेच, ते एका विशिष्ट निर्देशांकाचे (index) अनुकरण करतात.
४. लिक्विडिटी: ETF मध्ये तुम्ही सहज खरेदी-विक्री करू शकता, कारण ते स्टॉक एक्सचेंजवर व्यापार करता येतात. म्हणजेच एक्सचेंज वर ट्रेड होत असल्याने तुम्ही दिवसात कधीही विकू किंवा खरेदी करू शकता
5. गुंतवणुकीचे प्रकार: शेअर-बाजाराव्यतिरिक्त वस्तूंमध्ये (जसे सोन्याचा ETF), आंतरराष्ट्रीय मार्केट, किंवा विशिष्ट क्षेत्रांमध्ये (जसे तंत्रज्ञान, आरोग्यसेवा) ETF द्वारे गुंतवणूक करता येते.
उदाहरण:
SBI ETF Nifty 50: हा Nifty 50 निर्देशांकाचे प्रदर्शन प्रतिबिंबित करणारा ETF आहे.
Gold ETF: सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या ETF ला Gold ETF म्हणतात.
ETF फायदेशीर आहे का? याचे उत्तर गुंतवणूकदाराच्या उद्दिष्टांवर, जोखीम क्षमता, व गुंतवणुकीच्या कालावधीवर अवलंबून असते. ETF फायदेशीर ठरू शकतो, कारण त्यात काही महत्त्वाचे फायदे आहेत. पण प्रत्येक गुंतवणूक प्रकारात जोखीम असते, त्यामुळे त्याचे फायदे व तोटे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
हे ही वाचा : म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी
ETF मध्ये गुंतवणूक करत असताना त्यांचे फायदे व तोटे समजावून घेणे गरजेचे असते तर आपण यांचे फायदे व तोटे सविस्तर समजावून घेऊ
ETF गुंतवणूकीचे फायदे
1. विविधता (Diversification):
एकाच ETF मध्ये विविध कंपन्यांचे शेअर्स किंवा मालमत्ता असतात, त्यामुळे तुमची जोखीम कमी होते.
जसे, Nifty 50 ETF मध्ये Nifty 50 निर्देशांकातील 50 कंपन्या समाविष्ट असतात.
2. खर्च कमी (Low Expense Ratio):
म्युच्युअल फंडांच्या तुलनेत ETF चे व्यवस्थापन शुल्क कमी असते, कारण ते "पासिव्हली मॅनेज्ड" असतात. यामध्ये एक्झीट लोड ही नसतो. म्युच्युअल फंडाच्या तुलनेत ८० टक्के खर्च कमी असतो. जो दिर्घकाळात मोठा फायदा देऊन जातो.
3. सोयीस्कर ट्रेडिंग:
ETF चे खरेदी-विक्री शेअर मार्केटमध्ये दिवसातून कधीही करता येते.म्युच्युअल फंडां प्रमाणे ते एका दिवसाच्या शेवटी "NAV" वर अवलंबून नसते.
4. पारदर्शकता:
ETF कशामध्ये गुंतवणूक करत आहे हे गुंतवणूकदारांना अगदी स्पष्टपणे समजते.
5. लिक्विडिटी (Liquidity):
ETF शेअर मार्केटमध्ये सहज खरेदी-विक्री करता येतात, त्यामुळे तुम्हाला पैशांची गरज असताना सहज पैसे काढता येतात.
6. जोखीम कमी करणे:
निर्देशांकावर आधारित ETF (जसे Nifty 50 ETF) बाजाराच्या चढ-उतारांचे जोखीम कमी करतो, कारण ते विशिष्ट स्टॉकवर अवलंबून नसते.
ETF चे तोटे
1. मार्केट जोखीम (Market Risk):
ETF मार्केटवर अवलंबून असतात, त्यामुळे जर संपूर्ण बाजार घसरला, तर ETF ची किंमतही कमी होईल.
2. ट्रेडिंग शुल्क:
खरेदी-विक्री दरम्यान ब्रोकरेज व इतर खर्च लागतो, जो लहान गुंतवणूकदारांसाठी त्रासदायक असू शकतो.
३.सखोल अभ्यासाची गरज:
बाजाराचे चांगले ज्ञान आणि योग्य ETF निवडण्यासाठी अभ्यास करावा लागतो.
ETF फायदेशीर कधी ठरतो?
दीर्घकाळ गुंतवणूक ठेवल्यास कंपाऊंडिंगचा फायदा होतो.सुरक्षित आणि स्थिर परताव्याची अपेक्षा असेल तर:
Nifty 50 किंवा Sensex ETF मध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरते.
विविध उद्योगांवर आधारित ETF (जसे सेक्टर ETF) जोखीम कमी करतो.
सोन्याची गुंतवणूक:
Gold ETF हा शारीरिक सोन्याच्या खरेदीपेक्षा सोयीस्कर व सुरक्षित पर्याय आहे.
ETF फायदेशीर की नाही यासाठी टिप्स:
लक्ष्य स्पष्ट ठेवा: दीर्घकालीन वाढ किंवा अल्पकालीन नफा कशासाठी गुंतवणूक करायची हे ठरवा.
योग्य ETF निवडा: बाजार निर्देशांक, क्षेत्र, किंवा मालमत्तेवर आधारित ETF निवडा.
गुंतवणुकी पूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.
योग्य नियोजनाने आणि अभ्यासाने ETF फायदेशीर ठरू शकतो!
ETF मधून गुंतवणूकदारांना कमी जोखमीने व चांगल्या परताव्याची संधी मिळते. पण गुंतवणुकी पूर्वी आपल्या आर्थिक उद्दिष्टां नुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य सल्ला घ्यावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे