लोणावळा पर्यटन स्थळे | Lonavala Tourism information in Marathi लोणावळा हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळ असून याठिकाणी मुंबई पुण्याबरोबरच देशातून मोठ्या संख्येने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. लोणावळा हे पुणे जिल्ह्यात असून प्रमुख हिल स्टेशन आहे. याची समुद्रसपाटीपासून उंची ६२० मिटर असून सह्याद्री पर्वत रांगेमध्ये वसलेले आहे. मुंबई-पुण्यात पासून जवळ असल्याने विकेंडला पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. लोणावळा हे महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेच्या ठिकाणी पैकी आहे. या ठिकाणी उंच डोंगर रांगा दऱ्या धबधबे विपुल वनसंपदा किल्ले लेणी थंड हवा यासारख्या नैसर्गिक साधन संपत्ती बरोबरच मनोरंजन पार्क थीम पार्क कॅम्पिंग पॅराग्लायडिंग बंजी जंपिंग यासारख्या ऍक्टिव्हिटी मुळे पर्यटकांमध्ये प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू झाले आहे. लोणावळा पुण्यापासून ७० किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून साधारण शंभर किलोमीटर अंतरावर आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळविण्यासाठी पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात. लोणावळा हे ही वाचा: रत्नागिरी पर्यटन ...