नळदुर्ग किल्ला माहिती | Naladurg fort information in Marathi
नळदुर्ग किल्ला माहिती |Naladurg fort information in Marathi किल्ल्याचे नाव नळदुर्ग प्रकार भूईकोट जिल्हा. उस्मानाबाद जवळचे गाव नळदुर्ग सद्यस्थिती चांगली उस्मानाबाद जिल्ह्यातील बोरी नदीच्या काठावर असलेला नळदुर्ग किल्ला भूईकोट प्रकारातील आहे. पुराणकाळातील नळ दमयंती च्या नावावरून या किल्ल्याला नळदृग असे म्हणतात. नळदुर्ग किल्ल्याचे स्थापत्य तत्कालीन स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते याची जाणीव करून देते. महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला असून दोन ते अडीच किलोमीटरचा परिघामध्ये विस्तारलेला आहे. संवर्धनाच्या कामामुळे किल्ल्याला गतवैभव प्राप्त झाले आहे. किल्ल्याला संरक्षणाच्या दृष्टीने अति उंच संपूर्ण तटबंदी आहे. बोरी नदीच्या दुसऱ्या तीरावर रणमंडळ हा उप किल्ला असून त्याला बोरी नदीवरील बंधार्याने जोडले आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर किल्ल्यावर केलेला पाहायला मिळतो, जसे की संरक्षणाच्या दृष्टीने खंदक खणून त्यामध्ये पाणी सोडले आहे बोरी नदी वरी...