Dragon fruit farming in Marathi ड्रॅगन फ्रुट दिसायला सुंदर तितकेच आरोग्यासाठी लाभदायक आहे. निवडुंगाशी साधर्म्य असलेले ड्रॅगन फ्रुट उष्ण कटिबंधीय प्रदेशातील फळ आहे. याला बाजारपेठेत चांगली मागणी असून त्याचा सरासरी बाजारभाव २०० ते ३०० रुपये प्रति किलो इतका आहे. यांची भारतीय बाजारपेठेतील मागणीच्या मानाने लागवड नगण्य आहे. शेतकऱ्यांनी योग्य माहिती व सल्ला घेऊन याची लागवड केली असता भरघोस उत्पन्न मिळू शकते. लाल रंगातील ड्रॅगन फळ ड्रॅगन फ्रुट चे उगमस्थान उष्णकटिबंधीय भागातील असून प्रामुख्याने मेक्सिको व दक्षिण अमेरिका येथे आढळते. सध्या ड्रॅगन फ्रुट चे संपूर्ण जगभरामध्ये उत्पादन घेतले जाते त्यामध्ये प्रामुख्याने थायलंड तैवान चीन फिलिपिन्स श्रीलंका इस्राईल या देशांमध्ये व्यावसायिक लागवड केली जाते. ड्रॅगन फ्रुट लागवड माहिती भारतामध्ये ड्रॅगन फ्रुट ची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने या पिकाच्या लागवडी वर शेतकऱ्यां कडून भर दिला जात आहे. कर्नाटक गुजरात महाराष्ट्र केरळ आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये ड्रॅगन फळाची लागवड केली जात आहे. ड्रॅगन फळाच्या मागणीच्या मानाने उत्पादन अत्यल्प असल्याने याच्या लागवडीसा...