कोरीगड किल्ला महाराष्ट्रात असे काही थोडे किल्ले आहेत ज्यांना तटबंधी पहायला मिळते.त्यामध्ये वर्धनगड किल्ला, विसापूर किल्ला,यांना संपूर्ण तटबंदी असून तशाच प्रकारचा एक किल्ला म्हणजे कोरीगड! कोरीगड किल्ल्याला संपूर्ण ताशीव कडा व त्याच्या आकारामुळे व स्थानामुळे वेगळा ठरतो त्यामुळे आज आपन कोरीगड बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नाव कोरीगड/कोराईगड उंची ३१०० फूट प्रकार गिरीदुर्ग ठिकाण पेठ शहापूर,मावळ जिल्हा पुणे स्थिती चांगली चढाई सोपी गणेश दरवाजा कोरीगड किल्ला कुठे आहे: कोरीगड किल्ला पुणे जिल्ह्यातील बारा मावळ प्रांता पैकी ' कोर बारस ' मावळात आहे.मुळशी धरणाच्या पश्चिमेला व पवना धरणाच्या दक्षिणेकडे असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत लोणावळा डोंगररांगेत कोरीगड किल्ला आहे.लोणावळा व पाली दरम्यान असणाऱ्या सवाष्णी घाट माथ्यावर कोरीगड आहे. लोणावळ्या पासून दक्षिणेस पंचवीस किलोमीटर अंतराव...