थिबा पॅलेस रत्नागिरी थिबा पॅलेस कुठे आहे: रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील थिबा पॅलेस ब्रह्मदेश आणि रत्नागिरीचे अनोखे नाते सांगतो. रत्नागिरी शहरातील पर्यटन आकर्षण आणि महत्त्वाची वास्तू असलेला हा आलिशान राजवाडा म्हणजे थिबा राजासाठी जणू तुरुंगच भासत असावा. थिबा पॅलेस महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे. थिबा मीन राजा कोण होता: थिबा मीन राजा ब्रह्मदेश च्या राजगादी वर सन १८७८ मध्ये बसला, त्याच वेळी ब्रिटिशांनी ब्रह्मदेश चा काही भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. अशा परिस्थितीत थिबा राजाने ब्रिटिशांच्या राज्यविस्ताराला विरोध करून युद्ध पुकारले या युद्धामध्ये इंग्रजांच्या सैन्यापुढे थिबा राजाचा निभाव लागला नाही. या पराभवानंतर थिबा राजाचे कुटुंबीय चहूबाजूला विखुरले गेले. इंग्रजांनी पूर्ण ब्रह्म देशावर ताबा मिळवल्या नंतर थिबा राजा पुन्हा उठाव करेल या भीतीने त्याला स्थानबद्ध करून ब्रह्म देशापासून सुमारे ३००० किलोमीटर दूर असलेल्या मद्रास व तेथून कोकणातील रत्नागिरी या ठिकाणी इ.स.१८८५ मध्ये आणून ठेवले. जेमतेम सात वर्...