मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ठोसेघर धबधबा | Thoseghar waterfall information in Marathi

 ठोसेघर धबधबा माहिती.          पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना वर्षा सहलीचे वेध लागतात.त्यातच सातारा जिल्हा नैसर्गिक विविधतेने नटलेला असल्याने याला पर्यटनाचे नंदनवन म्हणून संबोधले जाते.पावसाळ्यात पर्यटक कास पठार, वजराई भांबवली धबधबा, नवजा ठोसेघर ,या ठिकाणी भेटी देत असतात.त्यातील कास पुष्प पठाराला युनिस्को वर्ल्ड हेरीटेज साइटचा दर्जा लाभला असल्याने हे ठिकाण जागतीक स्तरावर पोहोचले आहे.परंतु याला भेट देण्यासाठी सप्टेंबर महिन्याची वाट पहावी लागते.          ठोसेघर धबधबा महाराष्ट्रातील प्रमुख व परिचीत म्हणून गनला जातो.पावसाच्या पहील्या सरी बरसताच पर्यटकांचे पाय आपोआप या ठिकाणी ओढले जातात. सज्जनगड आणि ठोसेघर एकाच मार्गावर जवळ जवळ असल्याने आनंद द्विगुणित करतात.          ठोसेघर धबधबा सातारा जिल्ह्यात असून सातारा शहरा पासून २४ किमी अंतरावर असलेल्या ठोसेघर गावानजिक उगम पावणाऱ्या तारळी नदीवर आहे.या ठिकाणी पर्यटकांना निसर्ग सौंदर्याचा अदभुत सोहळा पाहण्याचे भाग्य लाभते.पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या धारा अंगावर घेत,ऊन पावसाचा खेळ, छोटे मोठे पाण्याचे प्रवाह, रानफुले, गर्द हिरवी झाडी हे अनुभव वर्षभरा

चावंड किल्ला माहिती

        मराठे शाहीचा इतिहास आणि गडकिल्ले यांचे नाते म्हणजे आई मुला सारखे घट्ट,या किल्ल्यांनी किती मावळ्यांना लढाई आणि गणिमी कावा करायला शिकवले असेल याची गणतीच नसेल.काती लढाया पाहिल्या असतील,किती तोफांचे गोळे पाठीवर घेतले असतील फक्त त्यांनाच माहीत.  स्वराज्याचा पाया रचला तोही गडांच्या साक्षीने आणि यांची मुहूर्त मेड रोवली ती म्हणजे छञपती शिवाजी महाराजांनी. परिचय:        सह्याद्री पर्वत रांगेत अनेक किल्ले उभे आहेत. त्यातील नाणेघाट या व्यापारी मार्गावर घाटाचे पहारेकरी म्हणून जीवधन,हडसर, शिवनेरी, आणि चावंड किल्ले परिचयाचे आहेत.       चावंड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून याची समुद्र सपाटी पासून उंची साधारण ३४०० फूट एवढी आहे. कुकड नदी च्या उगम स्थाना पाशी गड असल्याने याला 'कुकडनेर' असेही म्हणतात.        चावंड किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर पासून १५-१६ किलोमीटर अंतरावर आहे.या किल्लाच्या पायथ्याशी असलेल्या चावंड गावात पोहचायला ४०-४५ मिनिटे लागतात.येथे पोहोचवल्या नंतर आपल्याला मोबाईल ही फालतू गोष्ट आहे असे हमखास वाटते कारण या ठिकाणी कोनत्याही मोबाईल सिम कार्ड ला रेंज येत नाही.चावं

मल्हारगड किल्ला माहीती

परिचय     महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत त्यातील काही हजार वर्ष जुने आहेत काळाच्या ओघात अनेक किल्ल्याची पडझड  झाल्याने कोणता किल्ला सर्वात प्रथम बांधला हे जरी सांगता येत नसले तरी मल्हारगड हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात शेवटी बांधला गेल्याचा उल्लेख पेशव्यांच्या कागदपत्रत आढळतो.  मल्हार गडाची निर्मिती पेशव्यांचे सरदार पानसे यांनी इसवी सन सतराशे सत्तावन ते सतराशे साठ या काळामध्ये केली या किल्ल्याची निर्मिती महाराष्ट्रातील अन्य किल्ल्यांच्या तुलनेत अलीकडील असल्याने याला तरुणगड असेही म्हणतात.  पुणे जिल्ह्याच्या दक्षिण बाजूला सह्याद्री पर्वतरांगाच्या  दोन उपरांगा पूर्वेकडे जातात त्यातील भोलेश्वर डोंगररांगेत मल्हार गडाची बांधणी केली आहे यात रांगेत वज्रगड पुरंदर व सिंहगड येतात र दुसर्‍या रांगेत तोरणा व राजगड हे किल्ले येतात.  हा किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश पुणे सासवड रोड वरील दिवे घाटावर नजर ठेवण्यासाठी किंवा टेहळणी करण्यासाठी तोफ गोळे बनवण्याचा कारखाना यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या गडाच्या पायथ्याशी असणारे सोनोरी या गावात सरदार पानसे यांचे वास्तव्य होते या ठिकाणी त्यांचा वाडाही आह