सज्जनगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे: समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड किल्ला सातारच्या नैऋत्येस १३ कि.मी. अंतरावर आहे. प्रतापगड पासून सह्याद्री पर्वत रांगेची ऊपरांग शंभू महादेव डोंगररांगा जी पुर्वेकडे जाते त्या पैकी एका रांगेत उरमोडी नदीचा खोऱ्यात किल्ला आहे. सज्जनगड ची माहिती: समर्थ रामदास स्वामींच्या सहवासाने या किल्ल्याला धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. परळी गावात किल्ला असल्या कारणाने या किल्ल्याला परळीचा किल्ला असेही म्हणतात. ठोसेघर धबधबा व कास पुष्प पठार याच परीसरात असल्या मुळे पावसाळ्यात या ठिकाणी जास्त असते.समुद्र सपाटी पासून सज्जनगड किल्लाची उंची ३००० फुट इतकी आहे. किल्ला परळी गावात असल्याने या किल्ल्यास परळीचा किल्ला असेही म्हणतात. समर्थ सृष्टी : किल्ला पाहण्याची सुरुवात समर्थ सृष्टी पासून, सातार वरून सज्जनगड ला जाताना गजवडी फाटा लागतो.तिथूनच पुढे घाटामध्ये ज्ञानश्री शिक्षण समूहाच्या प्रांगणात समर्थ सृष्टी निर्माण केली आहे.तेथे सुरवातीला विशाल मारूती ची मुर्त...