गोवा पर्यटकांन स्थळ | goa tourist attractions गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून भारतातील मुख्य पर्यटन स्थळ पैकी एक आहे त्यामुळे गोव्याला देश-विदेशातून असंख्य पर्यटक भेट देत असतात. स्वच्छ समुद्रकिनारे, वैविध्यपूर्ण खानपान, सुख सुविधा, असंख्य ऍक्टिव्हिटी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. हनिमून, फॅमिली ट्रिप, मित्रपरिवार बरोबर फिरायला जाण्यासाठी गोवा हे उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे आजच्या लेखामध्ये गोव्यातील मुख्यतः पर्यटन स्थळे व त्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. गोव्यातील समुद्र किनारे आणि तेथील नाईट लाईफ साठी गोवा पर्यटकांमध्ये खास प्रसिद्ध आहे. गोव्यातील सुंदर समुद्र किनारे, कसिनो, क्लब पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. तर आपण जाणून घेऊया लेखामध्ये गोव्यातील पर्यटन स्थळाबद्दल गोवा पर्यटन स्थळे गोव्यातील पर्यटन स्थळे | goa tourist places in marathi बागा बिच बागा बिच हा गोव्याला येणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती असलेला समुद्र किनारा आहे. तुम्हाला वेळेचे बंधन असेल तर सरळ तुम्ही बागा बिच ला जावे कारण या ठिकाणी सर्व सुख सुविधा उपलब...