लोणार सरोवर माहिती | Lonar Lake information in Marathi भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात असून त्याला लोणार सरोवर असे म्हणतात. युरोस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये लोणार सरोवराचा समावेश आहे लोणार सरोवर बेसाल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर असून त्याची निर्मिती उल्कापातामुळे झाली आहे. साधारणपणे अंडाकृती आकाराचे हे सरोवर त्याच्या विविध वैशिष्ट्यामुळे पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. लोणार सरोवराच्या परिसरामध्ये अनेक पुरातन मंदिर आहेत त्यातील काही मंदिर तर चक्क सरोवरामध्ये आहेत. या सरोवरावर बरेच संशोधन केले जात असते व त्याचे शोध निबंध वेळोवेळी प्रकाशित होत असतात. तर आपण लोणार सरोवराची माहिती या लेखांमध्ये लोणार सरोवर बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. लोणार सरोवर कुठे आहे लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. लोणार सरोवर हे लोणार गावामध्ये स्थित आहे. बुलढाणा शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर आहे तर, औरंगाबाद शहरापासून याचे अंतर साधारणपणे १५० किलोमीटर एवढे आहे. पुणे शहरापासून याचे अंतर ...