कास पठार माहिती | Kaas plateau information in Marathi सातारा पर्यटन स्थळांनी समृद्ध असा जिल्हा असून या ठिकाणी अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत त्यापैकी एक कास चे पठार रंगबिरंगी फुलांचा गालिचा पसरलेला असताना जनू स्वर्ग भासतो. फुलांचा बहर येताच पर्यटकांचे पाय आपोआप कासच्या दिशेने वळतात. कास पठारावर दुर्मिळ अशा अनेक वनस्पती असून त्यातील बऱ्याचशा नष्ट होण्याच्या मार्गावरील आहेत तर काही फक्त या पठारावरच सापडतात त्यामुळे याला २०१२ युनेस्को जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करून नष्ट होणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन करणे व नवीन वनस्पतींचे संशोधन करण्याचे काम हाती घेण्यात आले. पावसाळा सुरू झाला की विविध रंगाची व आकारांची रंगीबेरंगी फुले फुलू लागतात व पठारावर १२-१३ चौरस किमीच्या परिसरात रंगबिरंगी फुलांचा गालिचा पाहायला मिळतो, त्यामध्ये कार्वी, मिकी माऊस ऑर्किड सारखी कुरणे पहायला मिळतात. रंगीबेरंगी फुलपाखरे तसेच कोयना अभयारण्याचा परिसर असल्याने या ठिकाणी गवा, हरिण, ससे, भेकर, बिबट सरपटणारे प्राणीही पहायला मिळतात. महाराष्ट्राच्या सात आश्चर्य मध्ये कास पुष्प पठाराचा ...