मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जंजिरा किल्ला माहिती

जंजिरा किल्ला  नाव मुरुड जंजिरा प्रकार जलदुर्ग जिल्हा रायगड जवळचे गाव: राजापुरी मुरुड सध्य स्थिती : बरी Janjira fort information in Marathi      जंजिरा किल्ला म्हणजे सागरी महत्त्व लाभलेला किल्ला! त्याच्या निर्मिती पासूनच अभेद्य अशी बिरुदावली घेऊन आलेला किल्ला. पर्यटकांमध्ये जंजिऱ्या बद्दल कायम आकर्षण पहायला मिळते.चहुबाजूंनी समुद्राचे पाणी आणी एका छोट्या खडकावर भक्कम काळ्या पाषाणात  उभारलेला जंजिरा सुमारे चारशे वर्षां पासून दिमाखात उभा आहे. आज आपण याच अजेय अश्या जंजिरा किल्ल्याची माहिती पाहणार आहोत.      जंजिरा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून चहुबाजूने समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची ९० मीटर आहे. किल्ला बावीस एकर मध्ये विस्तारलेला आहे. किल्ल्याच्या सुरक्षेसाठी तटबंदीची उंची ४० फूट आहे. किल्ल्यावर जागोजागी १८ ते १९ टेहळणी बुरुज आहेत. किल्ल्यावरील कलाल बांगडी ही तोफ प्रसिद्ध आहे. जंजिरा किल्ला कुठे आहे:         जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेकडे मुरुड नजीक राजापुरी खाडीमध्ये आहे. राजापूरच...