विसापूर किल्ला नाव: विसापूर/इसापूर प्रकार: गिरिदुर्ग उंची: ३०३८ ठिकाण: लोणावळा/ मळवली जिल्हा: पुणे डोंगररांग: लोणावळा किल्ल्याची चढाई: सोपी सद्यस्थिती: बरी विसापूर किल्ला तट अधिक लेख वासोटा किल्ला इर्शाळगड विसापूर किल्ला माहिती: पवन मावळातील निसर्गसंपन्न अशा प्रदेशात लोहगड विसापूर ही दुर्गजोडी असून हे किल्ले बोरघाट या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष व नियंत्रण ठेवण्यासाठी बांधण्यात आले. लोहगड जसा प्रसिद्ध व परिचित आहे त्या मानाने विसापूर थोडा दुर्लक्षितच वाटतो, किंवा त्याचे महत्त्व झाकोळले जाते.परंतु याच्या इतिहासामध्ये डोकावले असता याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे याची जाणीव होते. महाराष्ट्रात अनेक दुर्ग जोड्या पाहायला मिळतात त्यामध्ये लोहगड विसापूर किल्ल्यांचा ही समावेश होतो. गिरिदुर्ग बांधत असताना शेजारी कोणती ही टेकडी किंवा पर्वत नसावा असा प्रघात आहे, कारण यामुळे मुळ किल्ल्य...