माथेरान हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळा पैकी एक असल्याने या ठिकाणाला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात मुंबई व पुण्यापासून समान अंतरावर असल्याने शनिवार रविवार तसेच सूट्टीच्या दिवशी पर्यटकांची वर्दळ जास्त जाणवते. उन्हाळ्यामध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर नंतर माथेरान हे हक्काचे ठिकाण आहे माथेरान कुठे आहे: माथेरान महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येत असून मुंबईपासून ११० किलोमीटर तर पुण्यापासून १२० किलोमीटर अंतरावर आहे हे ठिकाण मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्ग लगत आहे. सह्याद्री पर्वतरांगेच्या उपरांगेतील डोंगरमाथ्यावर वसलेले असून याची समुद्रसपाटीपासूनची उंची ८०३ मिटर म्हणजेच २६०० कुठे एवढी आहे. माथेरानच्या बाहेरच प्रशस्त असे वाहत तळ असून या ठिकाणी वाहन लावून प्रवेश करावा लागतो, माथेरान मध्ये सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी असून याठिकाणी वाहतुकीसाठी पायी, घोडा, व प्रवासी सायकल टांगा यांचा वापर माथेरानमध्ये फिरण्यासाठी करावा लागते. याचे सर्व नियोजन माथेरान गिरिस्थान नगर परिषदे मार्फत केली जाते. ब्रिटिश अधिकारी ह्य...